मुंबई : चित्रपटसृष्टीत किंग खान म्हणून ओळखीत असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडवर राज्य करणारा शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर (Mannat Bungalow) मोठी गर्दी करतात. मात्र शाहरुखचा मन्नत हा बंगला चर्चेचा विषय ठरला आहे. शाहरुख खान आता मन्नत बंगला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे शाहरुख खान आता कुठे राहायला जाणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम चालू होणार आहे. या दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. या घराचे काम आगामी काही महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळेच शाहरुख त्याच्या कुटंबासोबत लवकरच दुसरीकडे राहण्यासाठी जाणार आहे.
शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो बॉलिवुडवर राज्य करतोय. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आजही सिनेमागृहात मोठ्या संख्येने गर्दी होते. शाहरुख खानचे कपडे, त्याने वापरलेले घड्याळ, वापरलेले बुट हा देशभरात चर्चेचा विषय ठरतो. शाहरुखचा मन्नत हा बंगला तर देशभरात चर्चेचा विषय ठरतो. या घरापुढे फक्त एक फोटो काढण्यासाठी शेकडो लोक रोज मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करतात. दरम्यान, आता शाहरुख खानला त्याचा हाच मन्नत बंगला सोडावा लागणार आहे. आपली पत्नी आणि मुलांसह 24 लाख रुपयांच्या रेंटेड अपार्टमेंटमध्ये शाहरुखा राहावे लागणार आहे.
सर्व कुटुंब राहणार रेंटेड अपार्टमेंटमध्ये
शाहरुख खान नव्या ठिकाणी २४ लाख रुपयांच्या एका चार मजली अपार्टमेंटमध्ये त्याच्या परिवारासोबत राहणार आहे. यामध्ये त्याची पत्नी गौरी, सुहाना, अबराम आणि आर्यन या तिन्ही मुलांचा समावेश असेल. या सर्वांसाठी शाहरुख खानने चार मजली अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे. शाहरुखने चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी यांच्याकडून शाहरुखने हा अपर्टमेंट भाड्याने घेतला आहे.
दरम्यान, मन्नत बंगल्याच्या डागडुजीसाठी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाहरुखने हे अपार्टमेंट पुढच्या तीन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे.