Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली.



सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबियांनी केलेल्या अनेक मागण्यांपैकी ही एक मुख्य मागणी मान्य झाल्याने देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी समाधान समाधान व्यक्त केले असले तरी इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.



संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी मंगळवारी(२४ फेब्रुवारी) अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आज (२६ फेब्रुवारी) आंदोलनाचा दुसरा दिवस असून संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करत या दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. जोपर्यंत मागण्याविषयी आश्वासन मिळत नाही. जबाबदार अधिकारी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. वेळप्रसंगी पाणी न घेण्याचा इशारा देशमुख कुटुंबियांनी दिला.
Comments
Add Comment