Bhootnii : संजय दत्तचा 'भूतनी' चित्रपटाचा टीझर रिलीज; 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

मुंबई : अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) सोशल मीडियावर त्याच्या आगामी 'भूतनी' या चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. संजय दत्त हा लवकरच एका हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.



संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये संजय दत्त भूतनीसोबत भांडताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा करत संजय दत्तने लिहिले की, 'या गुड फ्रायडेला घाबरण्यासाठी एक नवीन तारीख मिळाली आहे, FridayThe18th! यापूर्वी कधीही न पाहिलेल्या हॉरर, अ‍ॅक्शन आणि विनोदासाठी सज्ज व्हा. भूतनी १८ एप्रिलला चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार. ' दरम्यान, टीजरमधील संजय दत्तचा लुक सर्वांच्या पसंतीस पडला आहे.


या आगामी चित्रपट भूतनीमध्ये संजय दत्तसह मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंग महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही एक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये मौनी रॉय भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून, चित्रपटाविषयी उत्साह खूपच वाढला आहे.


संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच 'बागी 4' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज केला जाणार आहे. याशिवाय तो 'हाऊसफुल 5' मध्ये देखील दिसणार आहे.


?si=9X2Xb6PRDetH9NQK
Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये