Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीBhootnii : संजय दत्तचा 'भूतनी' चित्रपटाचा टीझर रिलीज; 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

Bhootnii : संजय दत्तचा ‘भूतनी’ चित्रपटाचा टीझर रिलीज; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

मुंबई : अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) सोशल मीडियावर त्याच्या आगामी ‘भूतनी’ या चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. संजय दत्त हा लवकरच एका हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये संजय दत्त भूतनीसोबत भांडताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा करत संजय दत्तने लिहिले की, ‘या गुड फ्रायडेला घाबरण्यासाठी एक नवीन तारीख मिळाली आहे, FridayThe18th! यापूर्वी कधीही न पाहिलेल्या हॉरर, अ‍ॅक्शन आणि विनोदासाठी सज्ज व्हा. भूतनी १८ एप्रिलला चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार. ‘ दरम्यान, टीजरमधील संजय दत्तचा लुक सर्वांच्या पसंतीस पडला आहे.

या आगामी चित्रपट भूतनीमध्ये संजय दत्तसह मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंग महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही एक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये मौनी रॉय भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून, चित्रपटाविषयी उत्साह खूपच वाढला आहे.

संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘बागी 4’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज केला जाणार आहे. याशिवाय तो ‘हाऊसफुल 5’ मध्ये देखील दिसणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -