नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर हर महादेव… म्हणत देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर (एक्स) शुभेच्छा संदेश जारी केला आहे. आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या तिथीला साजरा होणारा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. पुराणांतील उल्लेखांनुसार, या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले, तसेच शिवशंकरांनी तांडवनृत्य केले, असे मानले जाते.
सभी देशवासियों को भगवान भोलेनाथ को समर्पित पावन-पर्व महाशिवरात्रि की असीम शुभकामनाएं। यह दिव्य अवसर आप सभी के लिए सुख-समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए, साथ ही विकसित भारत के संकल्प को सुदृढ़ करे, यही कामना है। हर-हर महादेव! pic.twitter.com/4gYM5r4JnR
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2025
‘भगवान भोलेनाथांना समर्पित महाशिवरात्री या पवित्र सणाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प बळकट करो, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे.