द्रमुकच्या अपप्रचारानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला खुलासा
कोईम्बटूर : जनगणनेच्या आधारे सीमांकन केल्यास तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ८ जागा गमवाव्या लागतील, असा अपप्रचार द्रमुक पक्षाकडून सुरु आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी देखील बुधवारी वक्तव्य दिले होते. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे सर्व फेटाळून लावले आणि राज्यातील एकही मतदारसंघ कमी होणार नसल्याचे आज, बुधवारी स्पष्ट केले.
कोइम्बटूर येथील जाहीर सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने सदस्यता मोहिमेद्वारे समाजातील सर्व भ्रष्टाचारींना पक्षात समावून घेत आहे. एमके स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा राज्यातील मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित करत आहेत. तामिळनाडूच्या लोकसभेतील जागा कमी होतील, असा अपप्रचार ते करत आहेत. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सीमांकनानंतरही दक्षिणेकडील कोणत्याही राज्याच्या जागा कमी होणार नाहीत असे शाह यांनी सांगितले.
Indonesia Earthquake : इंडोनेशियात ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी २५ रोजी स्टॅलिन म्हणाले होते की, तामिळनाडूला कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वीरित्या राबवल्यामुळे लोकसभेतील ८ जागा गमावण्याचा धोका आहे. लोकसभा सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी राजकीय पक्षांना सर्वपक्षीय बैठकीसाठी आमंत्रित केले जाईल. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. स्टॅलिन यांच्या दाव्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्र्यांचा खुलासा आला असून राज्यातील लोकसभेची एकही जागा कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.