जकार्ता : इंडोनेशियात आज पहाटे मोठ्या भूकंपाचे धक्के बसले आहेत.इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांताच्या किनाऱ्यावर ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला.याविषयी युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने माहिती दिली आहे. यामध्ये सध्या कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
Mahashivratri 2025 : हर हर महादेव… पंतप्रधानांकडून देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
स्थानिक वेळेनुसार इंडोनेशियात सकाळी ६:५५ वाजता जमीनीत भूकंप १० किलोमीटर (६.२ मैल) खोलीवर झाला. इंडोनेशियन हवामानशास्त्र संस्थेने याची पुष्टी केली आहे. याशिवाय, माहिती देताना त्यांनी सांगितले की, भूकंपामुळे सध्या तरी त्सुनामीचा धोका नाही.”या भूकंपामुळे देशात सध्या कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही, परंतु इंडोनेशियन अधिकारी या घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहेत.
भूकंपग्रस्त भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंडोनेशिया हा प्रशांत महासागराच्या “रिंग ऑफ फायर” वर स्थित एक मोठा द्वीपसमूह आहे. हा एक अत्यंत सक्रिय भूकंपाचा पट्टा आहे, जिथे टेक्टोनिक प्लेट्स नियमितपणे एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो.