Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

जीबीएस खर्चासाठी पुणे मनपाकडून दिली जाणारी आर्थिक मदत बंद

जीबीएस खर्चासाठी पुणे मनपाकडून दिली जाणारी आर्थिक मदत बंद
मागील महिन्यापासून गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी महापालिकेकडून दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अमलबजावणी १ मार्चपासून केली जाणार आहे.



सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डिएसके विश्व या भागात मागील महिन्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. महापालिकेकडून या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत २ लाख तर इतर रुग्णांना १ लाखांची मदत देण्यात येत होती. मात्र, या साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. त्यामुळे नवीन बाधित रुग्ण आठवड्यात एखादा सापडतो. याशिवाय या आजाराचे रुग्ण वर्षभर सापडत असल्याने सर्वांनाच मदत देणे शक्य नाही, त्यामुळे असल्याने उपचारासाठीची दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मार्च पासून केली जाणार आहे.
Comments
Add Comment