मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तान संघासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यांच्याकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. अफगाणिस्तानच्या संघाला ही संधी पावसामुळे मिळाली आहे. मात्र सेमीफायनलसाठी अफगाणिस्तानच्या संघाला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागेल. अफगाणिस्तानचा संघ धक्कादायक निकालासाठी प्रसिद्ध आहे.
मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार होता. मात्र पावसामुळे हा सामना पूर्णपणे रद्द करण्यात आला. एकही बॉल न खेळता हा सामना रद्द करण्यात आला.
हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. या पद्धतीने दोन्ही संघाकडे ३-३ गुण झाले आहेत. चांगल्या रनरेटच्या आघारावर आफ्रिकेचा संघ ग्रुप बीमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर काबिज ऑस्ट्रेलियाचा रनरेट ०.४७५ आहे.
यानंतर इंग्लंड आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत त्यांचे प्रत्येकी एक सामना खेळले आहेत . हा सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाला थोडा फायदा झाला आहे. तर इंग्लंड आणि आफ्रिकेसाठी करो वा मरोची स्थिती बनली आहे. या पद्धतीने ग्रुप बीमध्ये सेमीफायनलचे समीकरण अधिक रंज झाले आहे. तर अफगाणिस्तानच्या संघासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
ऑस्ट्रेलिया आपला ग्रुपमधील शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर कांगारुंना हा सामना काही करून जिंकावाच लागेल. हा सामना जिंकताच संघाचे ५ गुण होतील आणि ते सेमीफायनलसाठी क्वालिफाय करतील.
दुसरीकडे आफ्रिकेला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना त्यांच्यासाठीही करो वा मरोचा असेल. सेमीफायनलमधील एंट्रीसाठी हा सामना त्यांना काही करून जिंकावाच लागेल. जर दोन्ही साम्यांचे निकाल आले तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेचे संघ ५-५ गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचतील. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानचे संघ बाहेर पडतील.
दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला आणखी २ सामने खेळायचे आहे. हे दोन्ही सामने अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहेत. इंग्लंडचा संघ हे दोन्ही सामने जिंकत असेल तर ते सेमीफायनलमध्ये एंट्री करतील. या स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान बाहेर जातील. तर आफ्रिका क्वालिफाय करतील.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…