Saturday, August 16, 2025

Bank Holiday : मार्च महिन्यात 'इतके' दिवस असणार बँकांना टाळे! पाहा यादी

Bank Holiday : मार्च महिन्यात 'इतके' दिवस असणार बँकांना टाळे! पाहा यादी

मुंबई : फेब्रुवारी महिना अखेरीस अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून आगामी मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बँक सुट्टीची यादी जाहीर करते. त्याचप्रमाणे मार्च महिन्यातील बँक सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी देखील जारी झाली आहे. यामध्ये शनिवार आणि रविवार वगळता इतर काही दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना बँक सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेचे कामे पूर्ण करा, असे आवाहन करण्यात आले आहे.



भारतीय रिझर्व्ह बँकेने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) जारी केलेल्या बँक सुट्ट्यांनुसार दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार वगळता आठ दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. तर काही राज्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. जाणून घ्या याबाबतची संपूर्ण यादी.




  • २ मार्च - २ मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहे.

  • ७ मार्च - यादिवशी चपचार कुट हा मिझोरमचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे, जो वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असल्याने मिझोरममध्ये बँका बंद राहतील.

  • ८ मार्च - यावेळी दुसरा शनिवार असल्याने देशभरातली सर्व बँका बंद असणार आहे.

  • ९ मार्च - यादिवशी रविवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.

  • १३ मार्च - यादिवशी होलिका दहन किंवा छोटी होळी हा होळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. तर दुसरीकडे, अट्टुकल पोंगळा हा तिरुअनंतपुरममधील अट्टुकल भगवती मंदिरात १० दिवसांचा उत्सव असतो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.

  • १४ मार्च - यादिवशी देशभरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी सण साजरा केला जातो. यावेळी गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, बिहार, मेघालय आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

  • १५ मार्च - होळी/याओसांग (दुसरा दिवस) होळी सणाच्या अनुषंगाने, त्रिपुरा, ओडिशा, मणिपूर आणि बिहारमध्ये बँका बंद राहतील.

  • १६ मार्च - यादिवशी रविवार असल्यामुळे देशातील बँका बंद असणार आहेत.

  • २२ मार्च - हा दिवस 'बिहार दिन' हा राज्याचा स्थापना दिवस आहे आणि २२ मार्च रोजी साजरा केला जातो. त्या दिवशी बिहारमध्ये बँका बंद राहतील. तसेच यादिवशी चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.

  • २७ मार्च - हा दिवस शब-ए-कद्र ही ती रात्र आहे जेव्हा मुस्लिमांचा असा विश्वास आहे की कुराण पहिल्यांदा पैगंबर मुहम्मद यांच्यावर अवतरित झाले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.

  • २८ मार्च - जुमात-उल-विदा हा रमजान महिन्यातील ईद-उल-फित्रपूर्वीचा शेवटचा शुक्रवार आहे. या निमित्ताने जम्मू आणि काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

  • ३० मार्च - यादिवशी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.

  • ३१ मार्च - यादिवशी रमजान-ईद (ईद-उल फितर) असल्याने देशातील बँका बंद असणार आहेत.

Comments
Add Comment