Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPlane Crash : सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळून, अधिकाऱ्यांसह नागरिकांचा समावेश

Plane Crash : सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळून, अधिकाऱ्यांसह नागरिकांचा समावेश

खार्टुम : सुदानमध्ये एका लष्करी विमानाचा अपघात झाला आहे. या घटनेत लष्करी अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुदानी सैन्याने दिली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सुदानी सैन्याने एक निवेदन जारी केले आहे.

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान वाडी सेडना विमानतळावरून उड्डाण घेत असताना कोसळले, यामध्ये लष्करी कर्मचारी आणि नागरिक मृत्युमुखी पडले तर काही जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, असे निवेदनात म्हटले आहे. अँटोनोव्ह विमानाच्या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड होता. ग्रेटर खार्तूमचा भाग असलेल्या ओमदुरमनमधील लष्कराच्या सर्वात मोठ्या लॉजिस्टिक केंद्रांपैकी एक असलेल्या वाडी सेडना विमानतळाजवळ हा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की, हा विमान अपघात झाल्यानंतर अनेक घरांचे नुकसान झाले. विमान कोसळल्यानंतर मोठा विस्फोट झाला. ज्यानंतर आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, अल ओबैद हे सुदानच्या व्यापार आणि शेतीसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे शहर दक्षिण सुदान ते पूर्व सुदानमधील पोर्ट सुदानपर्यंत जाणाऱ्या तेल पाइपलाइनच्या मार्गावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -