चार भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध

  85

कच्च्या तेलाची बेकायदेशीर मार्गाने विक्री करणा-या इराणच्या तेल उद्योगाशी संबंध


वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उद्योगांशी संबंधित कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये चार भारतीय कंपन्यांचा देखील समावेश आहे.


अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे नेटवर्क कोट्यवधी डॉलर्सच्या कच्च्या तेलाची विक्री बेकायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत.


परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांचा हा निर्णय इराणच्या कठोर धोरणांविरुद्ध आहे. इराणकडून बेकायदेशीरपणे होणारी कच्च्या तेलाची विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.



यामध्ये ऑस्टिन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, बीएसएम मरीन एलएलपी, कॉसमॉस लाइन्स इंक आणि फ्लक्स मेरीटाईम एलएलपी या भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.


मात्र, आतापर्यंत भारताकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारताचे इराण आणि अमेरिका दोन्ही देशांसोबत संबंध चांगले आहेत. भारत अमेरिका संबंध चांगले असले तरी गेल्या काही काळापासून USAID निधीमुळे तणावाचे वातावरण आहे.


ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या तेल उद्योगावर आयातींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा वाढता दबाव दोन्ही देशांतील संबंध बिघडवू शकतो असे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय व्यापार क्षेत्रात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे भारताला दोन्ही देशांसोबत संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Video | तिसऱ्यांदा अपयश! एलन मस्कच्या स्पेसएक्स स्टारशिपमध्ये भीषण स्फोट!

टेक्सास : एलन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्पेसएक्स स्टारशिप’ प्रकल्पाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.

इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर!

वॉशिंगटन डीसी : इराण इस्त्रायल यांच्यातील संघर्ष युद्धात परिवर्तीत झाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर घातक

लवकरच इराणमध्ये सत्तांतर होणार, मोहम्मद रझा पहलवींचे वंशज देशाचे नेतृत्व करणार ?

तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता वाढू लागली आहे. अमेरिका इस्रायलला इराण विरुद्धच्या

Israel-Iran War: इराण-इस्त्राईल संघर्षात अमेरिका घेणार उडी, ट्रम्प यांनी दिली प्लानला मंजुरी

तेहरान: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष हा सातव्या दिवशीही सुरूच आहे. एकीकडे इस्त्रायल तेहरानमध्ये विविध

Israel-Iran War: खमेनेई यांच्या ठिकाणांवर इस्त्रायलचा जोरदार हल्ला, देशाला संबोधित केल्यानंतर झाला हल्ला

तेहरान: इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनेई यांनी देशाला संबोधित केले. लाईव्ह टीव्हीवर संबोधित केल्यानंतर काही

शरण येणार नाही, खमेनेईने केले जाहीर

तेहरान : शरण येणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Khamenei) यांनी जाहीर केले. इस्रायलने इराणवर हल्ला करुन