Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pink E-Rickshaw : अमरावती ई पिंक- रिक्षासाठी केवळ २९३ महिला ठरल्यात पात्र

Pink E-Rickshaw : अमरावती ई पिंक- रिक्षासाठी केवळ २९३ महिला ठरल्यात पात्र

अमरावती : महिला सक्षमीकरण व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, या संकल्पनेतून महिलांसाठी असलेल्या ई-पिंक रिक्षा योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट असताना केवळ २९३ लाभार्थी महिलांचे अर्ज आले आहेत. उद्दिष्टपूर्ती कशी करावी, असा प्रश्न त्यामुळे महिला व बालविकास विभागासमोर उभा झाला आहे.


खास महिलांसाठी २०२४ मध्ये ई-पिंक रिक्षाची योजना राज्य सरकारने महिला व बालविकास विभागामार्फत लागू केली आहे. २.७८ लाख रुपये किमतीचा एक ई-पिंक रिक्षा लाभार्थ्याला एकूण रकमेच्या ७० टक्के कर्जावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभाथ्यनि स्वतःचा हिस्सा १० टक्के द्यायचा असून, २० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. लाभार्थ्यांना ८० हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे.जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यामध्ये अमरावती शहरासाठी ३०० व ग्रामीण शहरी भागासाठी ३००, अशी उद्दिष्टांची विभागणी करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी लागू झालेल्या या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातून २९३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यास मंजुरी देण्यात आल्याचे महिला व बालविकास अधिकारी टेकाळे यांनी सांगितले.



लाभार्थी महिलांना ७० टक्के कर्ज विविध बँकांकडून मिळवून देण्यासाठी उत्पादक कंपनी स्वतः प्रयत्न करणार आहे. या कंपनीची चमू येणार असून ती बँकांसोबत करार करून कर्ज उपलब्ध करून देतील. यासाठी महिला लाभार्थ्यांचे सिबिल तपासण्यात येणार आहे. या रिक्षा शहरातील कोणत्या मार्गावर चालवण्यात याव्यात, ते प्रादेशिक - परिवहन विभागाकडून निश्चित - करण्यात येणार आहे. ई-रिक्षांसाठी - चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असले तरी त्यासाठी अद्याप जागेची निवड करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment