कल्याण-डोंबिवलीकरांनो येथे लक्ष द्या! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार १२ तास बंद

कल्याण (प्रतिनिधी) : उदंचन केंद्र देखभाल, दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याची, जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवता येत्या गुरुवारी (ता. २७) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह खराब झाले आहेत. या व्हॉल्व्हमधून पाणी गळती होते. जलवाहिन्यांची दुरुस्ती, देखभाली व अन्य कामांची होणार दुरुस्ती बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद कल्याण विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांच्या नियंत्रणाखाली ही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.


या पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये हवेचे (एअर) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात हा प्रश्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे.


काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील भूमिगत जलवाहिन्यांची तपासणी या बंदच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन या कालावधीत शहराच्या प्रत्येक भागात पुरेशा दाबावाने पाणीपुरवठा झाला पाहिजे यादृष्टीनेही ही जलवाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी केले आहे. काळात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०