मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही!

मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, तात्पुरता जामीन मंजूर

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. जोपर्यंत या प्रकरणात सुनावणी सुरु आहे, पर्यंत कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. एक लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही.


खोट्या कागदपत्रांच्या आधारे घरं लाटण्याच्या प्रकरणात त्यांना आता तात्पुरता दिलासा मिळाला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना सत्र न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर १९९५ साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती.



१९९५ ते १९९७ सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. १९९५ साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू आहेत.

Comments
Add Comment

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील 'रिसर्च प्रोजेक्ट'ला मंजुरी

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर करणार संशोधन बीड : बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व