“बांगलादेशने ठरवावे, त्यांना कसे संबंध हवे”
नवी दिल्ली : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशने भारतासोबत नेमके कसे संबंध हवे आहेत याचा निर्णय बांगलादेशने करावा, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले आहे.
बांगलादेशकडून वारंवार दोन्ही देशांमधील सौहार्दाच्या वातावरणाला तडे देणारे प्रकार घडल्यानंतर जयशंकर यांनी थेट कानउघडणी करणारे हे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आणि मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील हिंदूंच्या नरसंहारावर भारताने जोरदार आवाज उठवला आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार मात्र भारतासोबतचे संबंध बिघडवण्यात कोणतीही संधी सोडत नाही.
PM Modi : कृषी क्षेत्राचा गेल्या दशकात विकास झाला- पंतप्रधान
नुकतेच ओमानमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांची भेट घेतली होती. पण बांगलादेश सुधारत नसल्यामुळे या बैठकीनंतर सुमारे आठवडाभरानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बांगलादेशच्या प्रतिकूल वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.
यासंदर्भात जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला ठरवावे लागेल की ते आपल्याशी ते कशा प्रकारचे संबंध ठेवू इच्छितात? बांगलादेशासोबतचा आमचा दीर्घ आणि विशेष इतिहास १९७१चा आहे.
Fight Against Obesity : पंतप्रधान मोदींची लठ्ठपणाविरोधात मोहीम, १० सेलिब्रेटींना केले आवाहन
बांगलादेश भारतासोबत चांगले संबंध हवे आहे असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तेथे होणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. याबाबतचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा आहे, असे सुतोवाच जयशंकर यांनी केले.
द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांवरील जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच झाला आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे. आणि दुसरे म्हणजे बांगलादेशचे राजकारण आहे. आता त्यांनीच ठरवावं की त्यांना आमच्याशी कसे संबंध ठेवायचे आहे?