पंतप्रधान किसान सन्मान योजनेला ६ वर्षे पूर्ण
नवी दिल्ली : शेतीला बळकटी आणि शेतकऱ्यांना समृद्धी देणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला. आमचे प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती देत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Fight Against Obesity : पंतप्रधान मोदींची लठ्ठपणाविरोधात मोहीम, १० सेलिब्रेटींना केले आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) म्हंटले आहे की, ‘पीएम किसान योजनेला ६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. हे माझ्यासाठी खूप समाधान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमचा हा प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती देत आहे.
We are proud of our Annadatas and our commitment to improve their lives is reflected in the efforts highlighted in the thread below. #PMKisan https://t.co/gFEDeXrJ2J
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2025
गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला आहे. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतील त्यांची उपलब्धता वाढली आहे. यासोबतच शेतीचा खर्च कमी झाला आहे आणि त्यांचे उत्पन्नही वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले