मुंबईत मनपाच्या १० वर्षांत १०० शाळा बंद

मराठी माध्यमांच्या शाळांना गळती


मुंबई (वार्ताहर): एका बाजूला मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सरकार आणि साहित्य वर्तुळात प्रयत्न होत आहेत. नुकतेच राज्य सरकारने सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य केली. तसेच दिल्ली येथे होत असेलल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचा गजर करण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या मात्र रोडावत चालली आहे. मुंबई महापालिकेने नुकतेच 'युनिफाइड डिस्ट्रिक्ट इनफॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन (यूडीआयएसई)' कडे शाळांची माहिती संकलित करून दिली.


या आकडेवारीतून मागच्या दशकभरातील मराठी माध्यमांच्या शाळांची दुर्दशा दिसून आली आहे. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांत मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती. आता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २६२ वर आली. १० वर्षांत १०० शाळा बंद झाल्या आहेत. मराठी शाळांचा टक्का घसरत असल्यामुळे शिक्षक वर्ग आणि मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या सामाजिक धुरीणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार असताना अनेकांना मुंबईतून मराठी भाषेचा हास होत असल्याची भीती वाटते. काही शिक्षकांच्या मतानुसार, मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेने काही सक्रिय पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मुंबई मनपा संचालित मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले, "पालक इंग्रजी शाळांना प्राधान्य देत आहेत, म्हणून मराठी शाळा बंद करणे कितपत योग्य आहे? मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे." सरकारच्या धोरणावर इतर शिक्षकही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अमराठी शाळांवर मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करण्यापेक्षा सरकारने मराठी माध्यमाच्या शाळा आणखी कशा सुधारतील, याकडे लक्ष दिले पाहिजे.



पालकांचा कल बदलला


पालकांचा कल बदलला असल्यामुळे मराठी शाळांना उत्तरती कळा लागल्याचे मुंबई मनपाचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी मराठी माध्यमाच्या शाळांना गळती पालकांचा कल बदलला म्हणाले की, अनेक पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा खुणावू लागल्या आहेत, ज्याना तिथे प्रवेश मिळत नाही, ते दुसरा पर्याय म्हणून शाळा निवडतात, तथापि मागच्या तीन वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेश संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.


फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला. गेल्या वर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारने व्यापक मराठी भाषा धोरणाला मान्यता दिली, त्याचाच हा भाग असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा