Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Vasai Accident : दोन दुचाकींची टक्कर, तिघांचा मृत्यू

Vasai Accident : दोन दुचाकींची टक्कर, तिघांचा मृत्यू
वसई : वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातात तीन तरुणांचा जणांचा मृत्यू झाला.
अॅक्टिव्हा आणि बाईक यांची समोरासमोर टक्कर झाली. दोन दुचाकींच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. तीन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वसई येथील राजीवली परिसरात रस्ता निमुळता आहे. या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आणि तीन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.
Comments
Add Comment