शहापूर : मुंबई – नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील रस्त्याची दुरुस्ती दोन टप्प्यांत होणार असल्याने आठ दिवस हलक्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोघा पर्यटकांचा मृत्यू
मुंबई – नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात किमी ४६६/८०० ते ४७४/३०० दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता २४ ते २७ फेब्रुवारी व ३ ते ६ मार्च दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हलक्या व जड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व चालकांना इप्सित स्थळी जाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून चालकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी केले आहे. नाशिक दिशेला जाणारी वाहने ४७४/३०० चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून वाहतूक उजव्या बाजूने नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.
तसेच नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी वाहने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुंबई-नाशिक वाहतूक करणारे वाहनांनी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्र. ६० वरून इच्छित स्थळी जातील.