Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीदहावीपर्यंत मराठीत शिक्षण हवे

दहावीपर्यंत मराठीत शिक्षण हवे

डॉ. तारा भवाळकर यांचे मातृभाषा टिकविण्यासाठी मराठीजनांना आवाहन!

नवी दिल्ली : मराठी भाषा टिकविण्यासाठी दहावीपर्यंत मुलांना मराठी माध्यमांत शिक्षण देण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. असे आवाहन अध्यक्षीय भाषणात डॉ. तारा भवाळकर यांनी केले. दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे.आपल्या भाषणात डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आपण मराठी लोकांनी साजरा केला. सगळ्यांप्रमाणेच मलाही आनंद झाला. कारण कुठलाही शासकीय दर्जा मिळाला की काही फायदे होत असतात. भाषेसाठी काही कोष राखीव ठेवला जाईल. आपल्या मराठी भाषेचा विकास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. तसंच इतरही अपेक्षा आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषा शिक्षणातून कमी होत चालली आहे, ती केवळ पालक इंग्रजी शाळेत घालतात म्हणून नाही तर मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्या मराठी माध्यमांच्या खासगी शाळा आहेत त्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही. शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात. पालक जबाबदार निश्तितच आहेत पण व्यवस्थाही जबाबदार आहे,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दिल्लीची नवीन कप्तान…

आमची पिढी नगरपालिकेच्या शाळेत शिकली, कमी फीच्या शाळेत शिकलो आहोत. आता फी भरूनही मुलांना शाळा चांगली मिळत नाही. कारण अनेक तरतुदी नाहीत. शारीरिक विधींसाठी मुलींसाठी व्यवस्थित सोय नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरूर करावा, कविता म्हणाव्यात. पण त्याचवेळी व्यावहारिक गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. तसंच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दहावीपर्यंतचं शिक्षण ते मराठी माध्यमांतूनच झालं पाहिजे, अशी अपेक्षा आमची आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवले जाते, पण ते दुय्यम मराठी म्हणून वेगळी पुस्तके केली जातात. मराठी मुलं ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळांमधून उच्च मराठीचीच पुस्तकं असली पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -