बाबर आझम अनफिट, भारताविरुद्ध खेळणार नाही ?

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या साखळी सामन्यात आज (रविवार २३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या आधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम सराव सत्रात सहभागी झालेला नाही. तो सराव सत्रात दिसलाच नाही. यामुळे बाबर आझम भारताविरुद्ध खेळणार की नाही, यावरुन तर्कवितर्क सुरू झाले आहेत.


बाबर आझम सराव सत्रात दिसलाच नाही !


कराची येथे बुधवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात घरच्या मैदानावर पाकिस्तानचा निराशाजनक पराभव झाला. यामुळे पाकिस्तानसाठी भारताविरुद्धचा सामना जिंकू किंवा मरू अशा स्वरुपाचा आहे. पण या महत्त्वाच्या सामन्याआधीच बाबर आझमविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्याआधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बाबर आझम खेळला नाही तर पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत होण्याचा धोका आहे. हीच पाकिस्तानसाठी मोठी चिंतेची बाब आहे.


भारताविरुद्धच्या सामन्याची तयारी म्हणून शनिवारी पाकिस्तानने सामन्याआधी सकाळी सराव केला. या महत्त्वाच्या सराव सत्राला बाबर आझम गैरहजर होता. यामुळेच बाबर आझम अनफिट असल्याच्या आणि भारताविरुद्ध खेळणार नसल्याच्या चर्चेने जोर धरला.


बाबर आझम आणि चिंता वाढवणारा फॉर्म


बाबर आझम सराव सत्राला का आला नव्हता याबाबत विचारले असता कोच अकिब जावेद बोलणे टाळले. चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड विरुद्ध बाबर आझमने ६४ धावा केल्या. पण या धावा त्याने ज्या गतीने केल्या ती बाब अनेकांची चिंता वाढवण्यास कारण ठरली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये चमकलेला फखर जमान दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आता आझम पण खेळणार नसेल तर पाकिस्तानची फलंदाजी आणखी कमकुवत होण्याचा धोका व्यक्त होत आहे.


बाबर आझमची कामगिरी


बाबर आझमने भारताविरूद्धच्या सात डावांमधून ३१.१ च्या सरासरीने आणि ७५.२ च्या स्ट्राईक रेटने २१८ धावा आहेत.

Comments
Add Comment

Cristiano Ronaldo : ‘हाच माझा शेवटचा विश्वचषक!’ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या भावनिक घोषणेनंतर फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा महिला टी-२० क्रिकेटवर दबदबा कायम; इंग्लंडला हरवत विक्रमी सातव्यांदा विश्वविजेते

Women's T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध करत टी-२०

FIFA WORLDCUP 2026 : १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडची मेक्सिकोवर मात; उपांत्यपूर्व फेरीत एर्लिंग हालंडच्या नॉर्वेशी होणार गाठ

मेक्सिको सिटी: एस्टाडिओ अझ्टेका स्टेडियमवर रव

FIFA WORLDCUP 2026 : अर्लिंग हालंडच्या झंझावाताने ब्राझील चितपट; नॉर्वे पहिल्यांदाच विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत

ईस्ट रदरफोर्ड, एनजे: फुटबॉलच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या एका ऐतिहासिक सामन्यात, नॉर्वेने पाच वेळच्या

Wimbledon 2026 Serena Williams : गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेरेना विल्यम्सची दुहेरीतून माघार

लंडन : अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने (Wimbledon 2026 Serena Williams) गुडघ्याच्या दुखापतीमुळे विम्बल्डन २०२६ मधील महिला

T20 Cricket : वैभव सूर्यवंशीच्या दमदार पदार्पणावर पाणी; इंग्लंडचा भारतावर ४ गडी राखून विजय

मँचेस्टर : भारताच्या युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात केली.