सांगली : प्रयागराजमधील एका यूट्यूबरने महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ शूट केले. हे व्हिडीओ त्याने यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले तसेच काही चॅनेलना विकले. या प्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने एका यूट्यूबरसह तिघांना अटक केली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील चिखली गावातील प्रांज राजेंद्र पाटील (२०) याचा समावेश आहे. शिराळा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.
GBS : जीबीएसचा वाढता धोका! नागपुरात तिसरा तर सांगलीत पहिला बळी
अटक केलेल्या तिघांनी देशातील ६०-७० रुग्णालयांचे सीसीटीव्ही हॅक केल्याचाही आरोप होत आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. आरोपींची ओळख पटली असून, प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फूलचंद, लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि शिराळ्यातील प्रांज पाटील अशी त्यांची नावं आहेत.
रविवारी २३ फेब्रुवारीला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
आरोपी महाकुंभात आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनेलवर विकत होते. प्रयागराजमधील आरोपीच्या चॅनेलवर महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ आढळले त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने महाराष्ट्रातून प्रज्वल तेली आणि प्रांज पाटील या दोघांना अटक केली. चंद्रप्रकाश फूलचंद याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली.