Sunday, March 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजरविवारी २३ फेब्रुवारीला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी २३ फेब्रुवारीला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मेगाब्लॉक काळात काही लोकल विलंबाने धावतील तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Crime : दादरच्या गेस्ट हाऊसमधून दोघांना अटक, १० कोटींचे अमली पदार्थ जप्त

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या वेळेत मेगाब्लॉक आहे. तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी – नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेगाब्लॉक आहे.

Thane News : ठाणे शहरात दोन महिन्यांत १४९ आगींच्या घटना

अंबरनाथ आणि वांगणीदरम्यान दोन पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी अप आणि डाऊन मार्गावर रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १.३० ते ३ या वेळेत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत बदलापूर स्थानकाच्या कल्याण दिशेला १२ मीटर रुंदीचा पादचारी पुलाचा गर्डर उभारला जाईल. तसेच बदलापूर-वांगणीदरम्यान ४ मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी गर्डर उभारला जाईल. या कामांमुळे गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात येईल. या गाडीला पनवेल थांबा देण्यात आला आहे.

Thane News : कुदळीने मारहाण करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजुरी

शनिवारी मध्यरात्री १२.१२ सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत धावेल.
शनिवारी ११.५१ सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत धावेल.
शनिवारी २३:१३ परळ -अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतर २.३० कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथवरून सुटेल.
शनिवारी ११.३० सीएसएमटी-कर्जत (ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल)
रविवारी ३.३५ कर्जत-सीएसएमटी (ब्लॉकनंतर पहिली लोकल)

चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर घेतला जाईल. यासाठी रात्री १२.५० बोरिवली – चर्चगेट आणि रविवारी पहाटे ४.३८ चर्चगेट – बोरिवली लोकल रद्द केली जाईल.

मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान रद्द लोकल फेऱ्या

मध्यरात्रीनंतर १२.१० बोरिवली-चर्चगेट
शनिवारी रात्री ११.४९ विरार-चर्चगेट
मध्यरात्रीनंतर १२.३० बोरिवली-चर्चगेट
मध्यरात्रीनंतर १२.०५ विरार-चर्चगेट

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -