Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mumbai Crime : दादरच्या गेस्ट हाऊसमधून दोघांना अटक, १० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Mumbai Crime : दादरच्या गेस्ट हाऊसमधून दोघांना अटक, १० कोटींचे अमली पदार्थ जप्त
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दादर रेल्वे स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर धाड टाकून जहांगीर शेख आणि सेनुअल शेख या दोघांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ५ किलो ४० ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ जप्त केला. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १० कोटी ८ लाख रुपये आहे. पोलीस या तस्करी प्रकरणात अटक केलेल्यांची कसून चौकशी करत आहेत. तस्करीशी संबंधित इतर व्यक्तींना शोधून अटक करण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.



तस्कर प्लास्टिकच्या झाडूमध्ये अमली पदार्थ लपवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत होते. झाडूच्या प्लास्टिकच्या नळीमध्ये अमली पदार्थ लपवले जात होते. अमली पदार्थ झाडूच्या प्लास्टिकच्या नळीमध्ये लपवण्याचे तंत्र समजावून सांगणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे युनिट नऊ करत आहे.



आरोपी जहांगीर शेख प्लास्टिकच्या झाडूंमध्ये अमली पदार्थ लपवून तस्करी करत होता. त्याने अमली पदार्थाने भरलेला झाडू दुसरा आरोपी सेनुअल शेखच्या घरी लपवला होता. पोलिसांनी तपासादरम्यान झाडू आणि त्यातील अमली पदार्थ जप्त केले. आरोपींना अमली पदार्थ पुरवणाऱ्या मुख्य पुरवठादाराचा शोध पोलीस घेत आहेत.



प्लास्टिकच्या झाडूमधून अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणात माटुंगा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी) आर/डब्ल्यू २२ (सी), २९ अंतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. पुरवठा साखळीशी संबंधित इतर लोकांचाही शोध सुरू आहे. लवकरच आणखी काही जणांना अटक होईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Comments
Add Comment