Friday, March 28, 2025
Homeक्रीडाIPL 2025 : मुंबई इंडियन्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा!

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा!

मुंबई : आयपीएल २०२५ (IPL 2025) मार्च महिन्यापासून सुरू होणार असून या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध झाले. दरम्यान आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) नवीन जर्सी लॉंच झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मागील हंगमात हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) संघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. मागील हंगामात संघाला केवळ ४ सामने जिंकता आले होते. अशातच आता संघाने पुन्हा पांड्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे संघ हार्दिक पांड्याच्याच नेतृत्वात आयपीएलचा १८ व्या हंगामात विजेतेपद जिंकू शकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Mahashivratri : महाशिवरात्रीआधी होणार मंगळ ग्रहाचं परिवर्तन! ‘या’ राशींवर घोंघावणार संकट

संघाची जर्सी निळ्या आणि सोनेरी रंगछटेतील असून मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर करत जर्सीचे अनावरण केले आहे. “प्रिय पलटण, आम्हाला माहित आहे की गेल्यावर्षीचा हंगाम विसरण्यासारखा होता. पण नव्या हंगामात कसं खेळायचं आपल्यावर अवलंबून आहे. तो चांगला ठरवण्याची संधी आहे. वारसा पुढे नेण्यासाठी २०२५ ही आपली संधी आहे. आम्ही मुंबई संघ असल्यासारखे मैदानात खेळू, ही फक्त आमची जर्सी नाही, तर हे तुम्हाला दिलेलं वचनही आहे. चला वानखेडेवर भेटू,” असा भावनिक मेसेज हार्दिक पांड्याने दिला आहे.

आयपीएल २०२५ चा उद्घाटन सामना येत्या २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाणार आहे. त्यांनतर दुसऱ्या दिवशी २३ मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज असा सामना सुरु होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -