मुंबई : प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशींमध्ये परिवर्तन करतो. याचा प्रभाव काही राशींवर चांगला किंवा वाईट पडतो. येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Mahashivratri 2025) साजरी केली जाणार आहे. मात्र त्याआधीच ‘मंगळ’ ग्रहांचा सेनापती मिथुन राशीत परिवर्तन करणार आहे. परंतु याचा काही राशींवर (Zodic signs) वाईट परिणाम होणार आहे. ज्योतिए शास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळाचे हे भ्रमण सोमवारी सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी थेट गतीने मिथुन राशीत जाणार आहे. हा प्रभाव ५ राशींसाठी हानिकारक असणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या दुसऱ्या, पाचव्या, आठव्या आणि नवव्या घरावर मंगळाचा परिणाम होणार आहे. या परिणामाच वृषभराशीच्या लोकांच्या उत्पन्नावर आणि बोलण्यावर होईल. विवाहित लोकांनी मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांसमोर आपले बोलणे नियंत्रणात ठेवावे. तसेच घरगुती कलह होण्याची दाट शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीत जन्मलेल्या लोकांना मंगळ थेट मिथुन राशीत गेल्याने प्रभावित होईल. या लोकांच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना घरापासून लांब अंतरावर बदलीचा सामना करावा लागू शकतो. मंगळाची दृष्टी ७ व्या घरात असल्याने आरोग्य बिघडू शकते आणि वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
तुळ
मिथुन राशीत मंगळ थेट आल्याने तूळ राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. या लोकांना प्रवास करावा लागू शकतो. ज्यामुळे अनावश्यक खर्च होईल. घरात आणि कुटुंबात तणावाचे वातावरण असेल, म्हणून संयमाने वागा. तसेच आरोग्याकडे विशेष काळजी देणे गरजेचे असेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ थेट येणे शुभ राहणार नाही. या लोकांच्या कुंडलीच्या आठव्या भागात मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. यामुळे जीवनात अनिश्चितता येईल. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या वादांमुळे नुकसान होईल, म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
धनु
धनु राशीच्या सातव्या घरात मंगळाचे भ्रमण अनेक आव्हाने निर्माण करेल. या लोकांच्या वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होणार आहे. करिअरमध्ये कामाचा ताण येऊ शकतो. आक्रमकता आणि वर्चस्ववादी वर्तन तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.
(अस्वीकरण : वरील दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रांच्या आधारे दिली आहे. ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)