ठाणे : महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावात हा गुन्हा घडला होता. सहा वर्षानंतर कुणाचा अंतिम निकाल लागला. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव शहाबाज मन्सूर शेख असे आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावाच्या नजीक असलेल्या शेतामधील झोपड्या मध्ये ४७ वर्षीय महिला तिच्या मुलीसोबत राहते. याचा गैरफायदा घेत शहाबाज मन्सूर शेख, वय ३२ वर्षे नामक आरोपीने घरात घुसून लोखंडी कुदळीने मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्काराचा प्रतिकार म्हणून पीडित महिलेने आरोपीच्या ओठाला चावा घेतला होता.
त्यामुळे आरोपीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन के कारंडे यांच्यासमोर गुरुवारी झाली. सरकारी वकील विजय मुंढे यांनी न्यायालयासमोर १४ साक्षीदार तपासून भक्कम साक्षी, पुरावा सादर करत जोरदार युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीशाने शेख याला बलात्काराचा गुन्हा दहा वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये, जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात दोन वर्षे सत्ता मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.