मुंबई : चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एक मोटारगाडी आणि एका दुचाकीवर क्रेन कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. गेल्या काही वर्षांपासून चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासस्थळी क्रेनच्या माध्यमातून विविध कामे करण्यात येत आहेत.
येथील इमारत क्रमांक ३५ जवळ शुक्रवारी सायंकाळी ट्रकमधील लोखंडी सळ्या क्रेनने उतरवण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक क्रेन कोसळली आणि जवळच उभ्या असलेली एक मोटारगाडी आणि दुचाकीवर पडली. सुदैवाने यावेळी मोटारगाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अपघातात मोटारगाडी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची नोंद केली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…