होळीला जाण्याकरता चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे सोडणार २८ विशेष ट्रेन

मुंबई - नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे - नागपूर मार्गावर धावणार गाड्या


मुंबई : होळी सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी येत असतात. १३ मार्चला होळीचा सण असून अनेकांनी रेल्वेचे बुकिंग करण्यास सुरूवात केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई - नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे - नागपूर दरम्यान २८ होळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा) : ट्रेन क्रमांक ०२१३९ ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च रोजी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक ०२१४० ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन नागपूर येथून ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च रात्री ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या गाडीसाठी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.



२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा). ट्रेन क्रमांक ०११५१ साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ मार्च आणि १३ मार्च रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५२ ही साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून ६ मार्च आणि १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि हे थांबे देण्यात आले आहेत.


३. लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) : ट्रेन क्रमांक ०११२९ साप्ताहिक विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १३ मार्च आणि २० मार्च रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११३० ही साप्ताहिक विशेष ट्रेन १४ मार्च आणि २१ मार्च (शुक्रवार) रोजी मडगाव येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड हे थांबे देण्यात आले आहेत.


४. लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा) : साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक ०११०५ १२ मार्च आणि १९ मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल. साप्ताहिक विशेष ट्रेन ०११०६ ही नांदेड येथून दि. १२ मार्च आणि १९ मार्च रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा आदी थांबे देण्यात आले आहेत.


५. पुणे - नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा) : साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक ०१४६९ ही दि. ११ मार्च आणि १८ मार्च रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल. साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक ०१४७० नागपूर येथून दि. १२ मार्च आणि १९ मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.


६. पुणे - नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा) : विशेष ट्रेन क्रमांक ०१४६७ ही पुणे येथून दि. १२ मार्च आणि १९ मार्च रोजी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्रमांक ०१४६८ ही नागपूर येथून दि. १३ मार्च आणि २० मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल. ०१४६९/०१४७० आणि ०१४६७/०१४६८ या गाडीसाठी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.


विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४०, ०११५१/०११५२, ०११२९/०११३०, ०४१६९/०४१७०, ०१४६७/०१४६८ आणि ०११०५ चे बुकिंग २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होणार आहे.तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

मुंबईकरांच्या सेवेत १५० नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस सज्ज!२१ मार्गावर दररोज १.९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई: मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या विकासाला गती; FDI साठी विशेष अधिकारी पद, जात प्रमाणपत्र, रेल्वे निधी... कॅबिनेटचे ७ मोठे धमाके!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ ऑक्टोबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या