Farah Khan : होळीला "छपरींचा सण" म्हणल्याने फराह खान विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री फराह खानच्या विरोधात पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. होळी सणाला छपरींचा सण म्हणल्याने फराहा खान विरोधात हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठकने त्याचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत तक्रार दाखल केली आहे.



'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या टेलिव्हिजन शोच्या २० फेब्रुवारी रोजीच्या


एका भागादरम्यान फराह खानने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी करत शुक्रवारी
(२१ फेब्रुवारी) खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. फराह खानवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विकास पाठकने तक्रारीत दावा केला आहे की फराहने होळीचे वर्णन 'छपरींचा सण' असे केले आहे आणि अपमानास्पद असा शब्द वापरला आहे. फराह खानच्या कॉमेंटमुळे त्यांच्या वैयक्तिक धार्मिक भावना आणि मोठ्या हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही हिंदुस्थानी भाऊ म्हणाला. फराहच्या या कमेंटमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.


वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले, 'फराह खानच्या या टिप्पणीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचे माझ्या अशिलाचे म्हणणे आहे. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी छपरी हा शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.' तक्रारीत असे लिहिले की, 'माझ्या क्लायंटने म्हटले आहे की आरोपीने केवळ माझ्या वैयक्तिक धार्मिक भावना दुखावल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात हिंदू समुदायाला त्रास दिला आहे. या घटनेत फराह खानचा सहभाग आहे. बॉलिवूडची एक आघाडीचे चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक, ज्यांनी अलीकडेच हिंदू सण होळीबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मी या तक्रारीद्वारे न्याय मागतो.

Comments
Add Comment

Suraj Chavan : हिरवी साडी, गजरा आणि सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा जलवा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सिझनचा विजेता (Bigg Boss Marathi Season 5 Winner) सूरज चव्हाण लवकरच आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने