ट्रक रिक्षावर पलटल्याने रिक्षा चालकासह दोन कॉलेज विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू; चार जखमी

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या दरेगावजवळ ट्रक रिक्षावर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकखाली रिक्षा दाबली गेल्यामुळे त्यातील रिक्षा चालकासह दोन कॉलेज विद्यार्थ्यांनीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन विद्यार्थीनी आणि ट्रक मधील दोन असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या दरेगावजवळ मुंबई आग्रा महामार्गावर रिक्षा चालक नेहमी प्रमाणे चार विद्यार्थिनीना कॉलेजमध्ये घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने जाणारा ट्रक रिक्षावर पलटी झाला.



अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षा आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन रिक्षाचा अक्षरशः चुरा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले व जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

Burgman 2026 Maxi-Scooter : भारतामध्ये सुझुकीची नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च

मुंबई : जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकीने भारतात आपली नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ