Thursday, March 27, 2025
Homeक्रीडा'ज्युनियर मुंबई श्री'चा थरार रविवारी मालाडमध्ये

‘ज्युनियर मुंबई श्री’चा थरार रविवारी मालाडमध्ये

मुंबई : फिटनेसच्या आवडीपोटी जिमच्या पायर्‍या चढणार्‍या तरुणांना शरीरसौष्ठवाची लागलेली चटक भागवता यावी, तसेच उदयोन्मुख आणि ज्युनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ‘ज्यूनियर मुंबई श्री’ रविवारी २३ फेब्रुवारीला मालाड पूर्वेला कासम बागेत असलेल्या दीनदयाल उपाध्याय मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला मिळेल. मालाडमध्ये होणार असलेल्या या स्पर्धेत आजच्या तरुणाईचा आवडता प्रकार असलेल्या फिजीक स्पोटर्सचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फिट असलेली तरुणाई वेगळ्या पोझेस मारताना दिसेलच पण या स्पर्धेबरोबर दिव्यांग, महिला आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गटाच्या मुंबई श्रीचे आयोजनही करण्यात आले आहे.

शरीरसौष्ठव खेळाची बालवाडी असलेल्या स्पर्धेसाठी मुंबईकर ज्युनियर खेळाडू गेले तीन-चार महिने जोरदार व्यायाम करीत आहेत. या स्पर्धेत आपल्या फार मोठे खेळाडू पाहण्याची संधी नसली तरी सहभागी स्पर्धक भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतील असा विश्वास बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे (जीबीबीबीए) अध्यक्ष अजय खानविलकर, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे (एमएसबीबीएफए) अध्यक्ष किटी फनसेका यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा दोन्ही संघटनांच्या संयुक्त आयोजनाखाली रंगणार आहे. मालाडमधील क्रीडा व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जय वरदानी ट्रस्टच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाखांपेक्षा अधिक रोख बक्षीसांचा वर्षाव विजेत्यांवर केला जाणार आहे. ज्युनियर स्पर्धेमध्ये एकंदर सहा गटांच्या या स्पर्धेचा विजेता १५ हजार रुपयांच्या रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल, अशीही माहिती जीबीबीबीएचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली.

Yuzvendra Chahal- Dhanashree Verma : 4 वर्षातच काडीमोड! भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट

ज्युनियर खेळाडूंची कसून तपासणी

वय चोरुन खेळणार्‍या शरीरसौष्ठवपटूंना रोखण्यासाठी संघटनेने ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंना आपण २३ वर्षाखालील असल्याचे सिद्ध करावयास सांगितले आहे. स्पर्धेच्या वजन आणि उंची तपासणीला खेळाडूंचे वयाचे दाखले म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि जन्माचा दाखला यापैकी कोणतेही दोन पुरावे, मूळ पत्र आणि झेरॉक्स प्रतसह आणणे बंधनकारक आहे. ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत खेळणारा स्पर्धक १ जानेवारी २००२ सालानंतर जन्मलेला असणे तर मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत उतरणारा स्पर्धक १ जानेवारी १९८५ पूर्वी जन्मलेला असणे गरजेचे आहे. तरीही काही खेळाडूंनी वय चोरण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्पर्धेला मुकावे लागेल, असे जीबीबीबीएचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी स्पष्ट केले.

सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

स्पर्धेला सर्वच गटातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे रविवारीच खेळाडूंची वजन तपासणी दुपारी १२ ते ३ यावेळेत घेतली जाणार आहे. स्पर्धेवर वेळेचे बंधन असल्यामुळे सर्व खेळाडूंना वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन एमएसबीबीएफएचे सरचिटणीस विशाल परब यांनी केले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुनील शेगडे (९२२३३४८५६८), राम नलावडे (९८२०६६२९३२) विजय झगडे (९९६७४६५०६३), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७) आणि राजेश निकम (९९६९३६९१०८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जीबीबीबीएचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -