साखरेच्या किंमती वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मागील एका महिन्यात भारतातील साखरेच्या किंमतीत ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खराब हवामान आणि साखर निर्यातीमुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला असून साखरेच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याने येणाऱ्या काही महिन्यात साखर महागणार असल्याचे सांगण्यात येते.

उद्योगाच्या अंदाजानुसार असे दिसून आले आहे की, १५ फेब्रुवारीपर्यंत भारताचे साखर उत्पादन दरवर्षी पेक्षा १२ टक्क्यांनी घटले आहे. प्रतिकूल हवामान आणि दोन वर्षानंतर साखर निर्यात पुन्हा सुरू झाल्याने साखर उत्पादनात कमतरता निर्माण झाली आहे. तसेच साखरेच्या उत्पादनात घट झाल्यामुळे साखर पुरवठा कमतरता निर्माण झाली आणि साखरेच्या किंमती वाढवल्या.कमी ऊस उपलब्धता आणि साखर कारखाने लवकर बंद झाल्यामुळे साखरेच्या किंमतीवर परिणाम झाला होता.
ऑक्टोबर ते मे अथवा जूनपर्यंत म्हणजे ४ ते ६ महिने सुरू असतात. यावर्षी उसाच्या तुटवड्यामुले यापूर्वीच बहुतांश साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्यावर्षी ५०५ साखर कारखान्याच्या तुलनेत यंदा केवळ ४५४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू सुरू केले. १ फेब्रुवारीपर्यंत उसाअभावी ७७ साखर कारखाने बंद झालेत तर मागील वर्षी केवळ २८ साखर कारखाने बंद झाले होते. याच काळात गेल्यावर्षी ४७७ कारखाने सुरू होत, तर सध्या ३७७ साखर कारखान्यांचा गाळीत हंगाम अद्याप सुरू आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत बंद झालेले बहुतेक साखर कारखाने महाराष्ट्र आणि कर्नाटक या भारतातील दोन शुगर उत्पादक राज्यांतील आहेत. एनएफसीएसएफ आणि भारतीय साखर आणि बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यासह,काही उद्योग संस्थांनी मागील वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एनएफसीएसएफच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १९७.६५ लाख टन होते. गेल्यावर्षी याच तारखेला २२४.७५लाख टन होते, असे देखील नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीने स्पष्ट केले आहे
Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत