Sunday, March 16, 2025
Homeक्रीडारविराज गायकवाडने पटकावली मराठा केसरी गदा

रविराज गायकवाडने पटकावली मराठा केसरी गदा

णे : तब्बल ३० मिनिटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पेहलवान रविराज गायकवाडने (Raviraj Gaikwad) कालीचरण सोलकरला चितपट करुन मराठा केसरीची गदा (Maratha Kesari Mace) आपल्या नावे केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ठाण्यात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आंब्रे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव संतोष सूर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला कुस्तीशौकिनांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्तीशौकिनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला.

‘ज्युनियर मुंबई श्री’चा थरार रविवारी मालाडमध्ये

रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्तीशौकिनांना अपेक्षित असा खेळ पहायला मिळाला. दोघांनीही एकापेक्षा एक डावपेच टाकत विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदेवर आपले नाव कोरत रोख बक्षीस पटकावले. धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली. पण ऐन खेळात धिरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. तिसरी क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्तीही ३० मिनिटांच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीत सोडली.

महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती चितपटीवर निकाली ठरली. हरियाणाच्या सोनिका हुड्डाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकावले. प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी झाली.

या कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेला देवा थापा यांची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली. प्रेक्षकांनी ह्या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले. समशेर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली.

तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला सदरचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -