City Killer : मुंबईवर 'सिटी किलर'चा धोका! नासाने दिला इशारा

  49

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी धोक्याची घंटा वाजली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा' (NASA) ने एका विशालकाय 'एस्टेरॉयड' (asteroid) विषयी इशारा दिला आहे, जो मुंबईसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. या एस्टेरॉयडला 'सिटी किलर' (City Killer) असे संबोधले जात असून, त्याचे नाव 'वायआर४' (YR4) आहे.



मुंबईवर एस्टेरॉयडचा धोका?


नासाच्या अंदाजानुसार २२ डिसेंबर २०३२ रोजी वायआर४ हा एस्टेरॉयड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याच्या पृथ्वीला धडकण्याची १.५ टक्के शक्यता वर्तवली जात आहे, जी खूपच चिंताजनक आहे. जर हा एस्टेरॉयड मुंबईला धडकला, तर संपूर्ण शहराचा नाश होण्याची शक्यता असून २ कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.



नासाची बारकाईने नजर


हा एस्टेरॉयड १३० ते ३०० फूट व्यासाचा असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जर तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तुटला, तरीदेखील एक महाविनाशकारी स्फोट होऊ शकतो, ज्याचा फटका संपूर्ण मुंबईला बसू शकतो. त्यामुळे नासा आणि अन्य जागतिक अंतराळ संस्था यावर सतत लक्ष ठेवून आहेत.



फक्त मुंबईच नाही, हे क्षेत्रसुद्धा धोक्यात!


नासाच्या अंदाजानुसार, फक्त मुंबईच नाही तर दक्षिण आशिया, पूर्वी प्रशांत महासागर, बोगोटा (कोलंबिया) आणि लागोस (नायजेरिया) यांसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरांनाही धोका निर्माण झाला आहे.





काय होऊ शकते परिणाम?



  • भयंकर स्फोट, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस

  • महाकाय लाटांचा (सुनामी) धोका

  • वायू आणि हवामानावर परिणाम, ज्यामुळे पृथ्वीवर तापमान बदलू शकतो



मुंबईकरांनी काय करावे?


तत्काळ घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र भारत सरकार आणि वैज्ञानिक संस्थांनी याकडे (City Killer) गंभीर लक्ष द्यावे लागेल. नासा आणि अन्य तज्ज्ञ वायआर४ चे हालचाल निरीक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला पृथ्वीपासून दूर ढकलण्यासाठी उपाययोजना केली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी सरकारी सूचनांचे पालन करणे आणि अधिकृत घोषणांची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता