IPL 2025 : चला भेटू, वानखेडे ला... म्हणत इंडियन जर्सीचा नवा लुक समोर!

मुंबई : जगभरात आयपीएल क्रिकेट (IPL 2025) सामन्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. क्रिकेटप्रेमी दरवर्षी आयपीएल सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता एक महिन्यानंतर यंदाच्या आयपीएल २०२५ सामन्याला सुरुवात होणार आहे. काल याबाबतचे वेळापत्रक जारी झाले असून आता आयपीएलसाठीचे मुंबई इंडियन्सच्या जर्सीचा (Mumbai Indians Jersey) नवा लुक समोर आला आहे.



मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ च्या जर्सीचे अधिकृतपणे अनावरण केले आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने 'चला भेटू, वानखेडे ला' असे म्हणत इंडियन जर्सीचे अनावरण केले आहे. या नवीन जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सची ओळख पटवणारे विशिष्ट निळे आणि सोनेरी रंग आहेत. निळा रंग विश्वास, आत्मविश्वास आणि संघाच्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे, तर सोने गौरव, यश आणि परिपूर्णतेच्या अटल शोधाचे प्रतिनिधित्व करत आहे.


दरम्यान, या जर्सीचे अनावरण करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये "प्रिय पलटन, २०२५ ही वारसा जिथे आहे तिथे घेऊन जाण्याची संधी आहे. निळ्या आणि सोनेरी रंगाच्या कपड्यांसह, आम्ही मुंबईसारखे खेळण्यासाठी मैदानावर उतरू. ही फक्त आमची जर्सी नाही. हे तुम्हाला वचन आहे. चला भेटू, वानखेडे ला (चला भेटूया, वानखेडेवर)," असे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. (IPL 2025)



कसे आहे आयपीएल २०२५ चे वेळापत्रक?


बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला जाईल. या सामन्यात हार्दिक पांड्या कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही. कारण गेल्या हंगामातील शेवटच्या सामन्यात त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत हार्दिकच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळताना दिसू शकतात. मुंबई इंडियन्स संघाने मेगा लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर पैज लावली आहे. ज्यामध्ये दीपक चहर, मिशेल सँटनर आणि विल जॅक्स सारखे खेळाडू समाविष्ट आहेत.



आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक


• २२ मार्च: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
• २३ मार्च: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, हैदराबाद (दुपारीचा सामना)
• २३ मार्च: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई (संध्याकाळचा सामना)
• ७ एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
• १३ एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, जयपूर
• २० एप्रिल: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई
• २५ मे: अंतिम सामना, ईडन गार्डन्स, कोलकाता.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व