Central Railway : 'ओपन अ‍ॅक्सेस' मुळे मध्य रेल्वेला ६ हजार ५ कोटींचा फायदा!

रेल्वेला स्वस्त दरात वीज खरेदी करण्याची मिळाली संधी


मुंबई : भारतीय रेल्वेने (Indian Railway) वीज खरेदीत मोठा बदल करून मोठ्या प्रमाणात बचत केली आहे. २०१५ पासून मध्य रेल्वेने ‘ओपन अ‍ॅक्सेस’ प्रणाली स्वीकारून थेट स्वस्त वीज खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या वीज खर्चात तब्बल ६ हजार ५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) हा निर्णय घेणारा पहिला विभाग ठरला असून, मागील १० वर्षांत त्याचा मोठा आर्थिक फायदा दिसून आला आहे.



पूर्वी भारतीय रेल्वे राज्य वीज मंडळे किंवा राज्य वीज वितरण कंपन्या यांच्याकडून वीज खरेदी करीत होती. महाराष्ट्रात या विजेचा दर तब्बल ९ रुपये प्रति युनिट होता. त्यामुळे रेल्वेच्या एकूण खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, मध्य रेल्वेने ‘ओपन अॅक्सेस’मधून वीज खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे ओपन अ‍ॅक्सेस प्रणालीमुळे रेल्वेला थेट वीज निर्मिती कंपन्याकडून किंवा बाजारातून स्वस्त दरात वीज खरेदी करण्याची संधी मिळाल्यामुळे महागड्या पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी झाले आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत शक्य झाली.


मध्य रेल्वेने २०१५ पासून ‘ओपन अ‍ॅक्सेस'मार्फत वीज खरेदी सुरू केली. त्यामुळे आता मध्य रेल्वेला १० वर्षांत रेल्वेच्या वीज खर्चात तब्बल ६ हजार ५ कोटी रुपयांची बचत झाली. ओपन अ‍ॅक्सेसमुळे वीज खरेदीचा दर ९ रुपयांवरून ५.५० ते ६.५० रुपये इतका कमी झाल्याने याचा थेट परिणाम रेल्वेच्या वीजबिलावर झाला. मध्य रेल्वेने वर्ष २०१५–१६ मध्ये रेल्वेने ७९४ दशलक्ष युनिट वीज वापरून १६१ कोटींची बचत केली होती. वर्ष २०१८–१९ मध्ये ही बचत ७१६ कोटी इतकी झाली. तर वर्ष २०२३–२४ मध्ये ती वाढून ७५२ कोटींवर पोहोचली.

Comments
Add Comment

काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष

ओशिवरा नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला, तब्बल ४० टक्क्यांनी अधिक वाढ

मुंबई (सचिन धानजी) : गोरेगाव (पश्चिम) एस व्ही रोडवरील ओशिवरा नाल्यावरील पुल पाडून नव्याने त्याची पुनर्बांधणी

दिवाळी पाडवा: जाणून घ्या महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत 

मुंबई: दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. दिवाळीच्या

महापालिकेत निवडणुकीची लगबग, महापौरांसह विविध अध्यक्ष, पक्ष कार्यालयांच्या डागडुजीला सुरुवात

मुंबई(सचिन धानजी) : राज्यातील मुंबई महापालिकेसहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव

निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवी योजना आणली असून आता कंत्राटी