हैदराबाद : तेलंगणातील वानपार्थी जिल्ह्यातील मदनपुरम मंडलमधील कोन्नूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये एक गूढ आजार पसरला आहे, ज्यामुळे अवघ्या 3 दिवसांत सुमारे २५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वानपार्थी जिल्ह्याचे जिल्हा पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अधिकारी के. वेंकटेश्वर यांनी ही माहिती दिली.
जिल्हा पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मते, ‘सुमारे २५०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत आणि आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि नमुने गोळा करून चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हे सर्व मृत्यू ३ दिवसांत झाले. त्यापैकी १६ तारखेला ११७ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून १७ तारखेला ३०० आणि उर्वरित कोंबड्या १८ तारखेला मृत आढळल्यात. त्यानंतर आम्हाला कळवण्यात आले आणि आम्ही १९ तारखेला नमुने प्रयोगशाळेत पाठवले. या सर्व कोंबड्या प्रीमियम फार्ममध्ये मृत्युमुखी पडल्याचे के. व्यंकटेश्वर यांनी सांगितले.