दादरमधील स्मशानभूमीतील प्रार्थनागृह, स्वच्छता गृहांची संख्या वाढवणार

  35

महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना दिले निर्देश


मुंबई (प्रतिनिधी): दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांची तसेच स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच स्मशानभूमी परिसरामध्ये हिरवळ लागवडीसह उत्तम नागरी सेवा - सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये मंगळवारी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भेट देऊन नागरी सेवा-सुविधांची पाहणी केली. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्मशानभूमीत असलेली दफनभूमी, दहनवाहिनी, केश कर्तनालय, प्रार्थनागृह तसेच येथील विविध इमारतींची गगराणी यांनी भेटीदरम्यान पाहणी केली. स्मशानभूमीची कार्यप्रणाली, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा तसेच नागरिकांच्या काही सूचना किंवा तक्रारी आहेत का इत्यादी माहिती अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली.


स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच, उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतील का, याबाबतही विचार करून कार्यवाही करावी. अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता सध्या येथे उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांच्या संख्येत वाढ करावी. ही प्रार्थनागृहे नाविन्यपूर्ण आणि कल्पकतेने बांधवीत. सध्या स्मशानभूमीमध्ये पारंपरिक पद्धतीने तसेच विद्युत दहनवाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी लाकूड इंधन म्हणून वापरण्याऐवजी अन्य काही स्रोतांचा वापर करता येईल का, याचाही अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश गगराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा, मंत्री अतुल सावेंची माहिती

मुंबई : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे

काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दिसतं नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजपा प्रवेश...

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचं नेतृत्व दिसत नाही, अशी भूमिका व्यक्त करुन यापूर्वी काँग्रेसच्या

BMC Election News: शिवसेना लढणार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीएमसी निवडणूक

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेणार! मुंबई: मुंबई

हिंदी भाषेला पर्याय आम्ही दिला आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी पत्रकार परिषद घेत पहिली पासून हिंदी भाषा शिकण्यास सक्ती नको. अशी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पवई तलाव भरुन वाहू लागला

मुंबई : आनंदाची बातमी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी पवई तलाव आज म्हणजेच बुधवार १८ जून २०२५ रोजी सकाळी

मध्य रेल्वेवर प्रथम श्रेणी डब्यांमध्ये कारवाई सुरूच

मुंबई : लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये काल सोमवारपासून केंद्र तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात