मुंबई : नुकतेच दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर आता लवकरच पुढील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. अशातच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) दहावी बोर्ड (SSC Exam) परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची आता दोनवेळा दहावीची परीक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘सीबीएसई’ने २०२६ पासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘सीबीएसई’चे अधिकारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यामध्ये दहावी सीबीएससी बोर्डाची दोनदा परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाची चर्चा करण्यात आली. अद्यापही यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरीही हा मसुदा पुढील आठवड्यात सोमवारी सार्वजनिक करण्याचे नियोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान होणाा ताण आणि भीती कमी करण्यासाठी सीबीएससी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यामुळेएखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा काही कारणाने त्याची परीक्षा चुकली तर तो पुन्हा परीक्षेला बसू शकतो. तसेच विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेतील गुणांनी समाधान झाले नाही तर, तो पुढच्या वेळी पुन्हा परीक्षेला बसू शकतो. यामध्ये वर्षाच्या दोन्ही बोर्ड परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे फक्त सर्वोत्तम गुण विचारात घेतले जाणार आहेत. दरम्यान, याबाबतचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल, त्यावर लोकांकडून सूचना मागवल्या जातील. तसेच ‘सीबीएसई’ मंडळाकडून त्यांच्या २६० संलग्न परदेशी शाळांसाठी जागतिक अभ्यासक्रम सादर केला जाणार आहे. (SSC Exam)