मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांची लाईफ लाईन आज सकाळपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे.
Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्याची आयुक्तांची ग्वाही
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा-खडवली या दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून मालगाडीचे कपलिंग दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. पण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला जास्तवेळा थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान दुरुस्तीचं काम सुरु असून लवकरच गाड्या पुर्ववत होण्याची माहिती मिळाली आहे.