Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीISRO : इस्त्रोचे मोठे यश, चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का

ISRO : इस्त्रोचे मोठे यश, चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का

नवी दिल्ली  : विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली असून मिशन पूर्ण झाले आहे.चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का आहे. ही कामगिरी इस्त्रोचे मोठे यश मानले जाते. ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्रयान-३ च्या लँडर विक्रमने सॉफ्ट लॅडिंग केली होती. त्यानंतर अंतराळाच्या इतिहासात नवीन आध्याय जोडला गेला होता. या मिशनमध्ये भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) वैज्ञानिकांना एका नवीन आव्हानांचा सामना करावा लागला होता. विक्रमकडे अजून काही प्रोपेलेंट शिल्लक होते. त्यावेळी इस्त्रोमधील काही शास्त्रज्ञांचे मत होते की ते असेच वाया जाऊ नये. त्याच वेळी काही शास्त्रज्ञ म्हणत होते की, अभियान आधीच यशस्वी झाले आहे आणि आता कोणत्याही अतिरिक्त प्रयोगांची गरज नाही. यामुळे दोन मतप्रवाहन निर्माण झाले.
शेवटी इस्त्रोने आपल्या योजनेत बदल केला. चंद्रावर विक्रम लँडरचा अप्रत्याशित ‘हॉप’ (उडी मारणे) प्रयोग करण्यात आला. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून ४० सेंटीमीटरवर उठला. त्यानंतर जवळपास ३०-४० सेंटीमीटर लांब जावून लँड झाला. विक्रम लँडरने मारल्या या उडीमुळे इस्त्रोचा वैज्ञानिकांना सुखद धक्का बसला. तसेच भविष्यासाठी चांगले संकेत मिळाले.

Rekha Gupta : रेखा गुप्ता उद्या घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन हे सुद्धा त्यावेळी चंद्रयान – ३ मिशनमधील प्रमुख वैज्ञानिकांमध्ये होते. त्यांनी त्या दिवशाची आठवण करताना सांगितले की, लँडिंगच्या दिवशी खूप तणाव होता.परंतु, प्रोपेलेंट प्राणालीने पूर्ण काम केले.त्यानंतर चंद्रयान-३ चे लँडिंग झाले.हे मिशनचे मोठे यश होते. विशेष प्रोपेलेंटचा वापर करण्यासाठी त्यांनी इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ यांच्यासोबत चर्चा केली होती; परंतुत्यावेळी मिशनमध्ये सहभागी काही शास्त्रज्ञांनी या प्रयोगात रुची दाखवली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे होते, विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली आहे.त्यामुळे मिशन पूर्ण झाले आहे.अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमधील व्याख्यानात बोलताना नारायणन यांनी ही आठवण सांगितली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -