IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताचा विजय, मात्र बांगलादेशने विजयासाठी झुंजवले

  69

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी केवळ २२९ धावांचे सोपे आव्हान ठेवले होते. मात्र हे लक्ष्य गाठता गाठता भारताला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर भारताने बांगलादेशवर सहा विकेट राखत विजय मिळवला.


भारताला विजय मिळवून देण्यात शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली शानदार शतक झळकावले. शुभमनने १२५ बॉलमध्ये शतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर सलामीवीर रोहित शर्माने ४१ धावा तडकावल्या. त्याने जोरदार सुरूवात करून दिली. मात्र तस्कीन अहदमने माघारी धाडले. विराट कोहलीलाही खास कामगिरी करता आली नाही. त्याने २२ धावा केल्या. तर श्रेयस अय्यर १५ धावा करून परतला.


तत्पूर्वी, बांगलादेशच्या तौविद हृदॉयने ठोकलेल्या १०० धावांच्या जोरावर बांगलादेशला २०० धावांचा टप्पा पार करता आला होता. त्याला जाकर अलीने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला होता. झाकरने ६८ धावा केल्या. बांगलादेशचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अखेर बांगलादेशला ५० षटकांत केवळ २२८ धावा करता आल्या.



रोहित शर्माच्या ११ हजार धावा पूर्ण


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा इतिहास रचला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

रोहितला इथवर पोहोचण्यासाठी १२ धावांची गरज होती. त्याने आपले हे लक्ष्य बांगलदेशविरुद्धच्या सामन्यात सहज पूर्ण केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३६ बॉलवर ४१ धावा केल्या. यात ७ चौकारांचा समावेश होता.
Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी