Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीCyber ​​Fraud : विमान तिकिटांच्या नावाखाली सायबर फसवणूक

Cyber ​​Fraud : विमान तिकिटांच्या नावाखाली सायबर फसवणूक

मुंबई  : लोअर परळ येथील ५५ वर्षीय तक्रारदार महिला लाकडी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या आपल्या पतीसह प्रयागराजला जाण्याचा विचार करत होत्या. त्यासाठी त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी तंबू ऑनलाईन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला. त्यावेळी त्यांना टेन्ट सिटी महाकुंभ नावाचे संकेतस्थळ सापडले. त्यात एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर संपर्क साधला असता काही कालावधीनंतर एका व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे दूरध्वनी केला. त्या व्यक्तीने त्यांची व सहप्रवाशांची माहिती घेतली. तसेच दोन तंबू नोंदवण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली.

Mumbai Iranian bakeries : इराणी बेकरींना वारसा दर्जा द्या!

तक्रारदार महिलेने ३५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर सहा प्रवाशांच्या विमान तिकिटाच्या नावाखाली त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपये घेण्यात आले. थोडेथोडे करून तक्रारदार महिलेने एकूण तीन लाख ७८ हजार रुपये आरोपींना पाठवले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेचा फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर गुन्हे व ऑनलाइन फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी व रक्कम परत मिळवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. त्यासाठी तक्रारदार महिलेने रक्कम पाठवलेल्या बँक खात्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्या माध्यमातून शोध सुरू आहे. तसेच या खात्यांमधील रक्कम गोठवण्याबाबतही विनंती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -