Vicky Kaushal Shivjaynti Special : विकी कौशलच्या प्रमुख उपस्थितीत आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंती होणार साजरी

आग्रा : अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्र्याच्या किल्ल्यात यंदाची शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होणार आहे. यासाठी छावा चित्रपटात छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारा कलाकार विकी कौशल प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असणार आहे.


अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी शिवजयंती थाटामाटात साजर होणार आहे. अध्यक्ष विनोद पाटील यांनी या शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छावा चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल हे सर्वजण प्रमुख पाहुणे असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तळपलेल्या आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या आग्रा किल्ल्यात हा सोहळा पार पडणार आहे.



शिवरायांवरील गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागताने होईल.यानंतर शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि नाट्यरूपांतर केल जाणार आहे.तसेच शिव जन्माचा पाळणा आणि 'गर्जा महाराष्ट्र माझा' गीताचं सादरीकरण केल जाईन आणि मर्दानी खेळाचे थरारक सादरीकरण होणार आहे.


यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे व उत्कर्ष शिंदे यांचे गायन होईन.त्यानंतर शिवजन्माचा पाळणा आणि 'गर्जा महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताचं सादरीकरण करण्यात येणार आहे. अफझल खानाचा वध' या प्रसंगाचं नाट्यरूपांतर केलं जाईल. कोल्हापूरच्या सब्यसाची गुरुकुलकडून पारंपरिक मर्दानी खेळांचं सादरीकरण होणार आहे.यानंतर शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव व डिजिटल आतिषबाजी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक