आग्रा : अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्र्याच्या किल्ल्यात यंदाची शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होणार आहे. यासाठी छावा चित्रपटात छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारा कलाकार विकी कौशल प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असणार आहे.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी शिवजयंती थाटामाटात साजर होणार आहे. अध्यक्ष विनोद पाटील यांनी या शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छावा चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल हे सर्वजण प्रमुख पाहुणे असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तळपलेल्या आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या आग्रा किल्ल्यात हा सोहळा पार पडणार आहे.
शिवरायांवरील गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागताने होईल.यानंतर शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि नाट्यरूपांतर केल जाणार आहे.तसेच शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचं सादरीकरण केल जाईन आणि मर्दानी खेळाचे थरारक सादरीकरण होणार आहे.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे व उत्कर्ष शिंदे यांचे गायन होईन.त्यानंतर शिवजन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचं सादरीकरण करण्यात येणार आहे. अफझल खानाचा वध’ या प्रसंगाचं नाट्यरूपांतर केलं जाईल. कोल्हापूरच्या सब्यसाची गुरुकुलकडून पारंपरिक मर्दानी खेळांचं सादरीकरण होणार आहे.यानंतर शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव व डिजिटल आतिषबाजी करण्यात येणार आहे.