Friday, March 28, 2025
Homeदेशछत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान मोदींचे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान मोदींचे अभिवादन

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट (ट्वीट) केली. या पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.

त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.’ या शब्दात पोस्ट करुन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री करणार ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे नेतृत्त्व

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. आज बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या घटनेला आज ३९५ वर्षे पूर्ण झाली. एकाचवेळी मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, निजाम आणि इंग्रज अशा अनेक शत्रुंची आव्हाने पेलणारे आणि स्वतःचे आरमार स्थापन करुन भल्या भल्यांना आव्हान देणारे राजे ही छत्रपती शिवरायांची ओळख आहे. भारतीय नौदलाचे जनक आणि गनिमी कावा अर्थात कमांडो कारवायांचे तंत्र विकसित करणारे राजे अशीही शिवाजी महाराजांची ओळख सांगितली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -