ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

कोंढवडला हिवाळे वस्तीवर बिबट्याचा धुमाकूळ


राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात आजही बिबट्याची दहशत कायम असून, सायंकाळ व रात्रीच्या वेळी कोंढवड येथील हिवाळे वस्तीवर हल्ला करून एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला तर अन्य पाळीव पशु त्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले. वनविभागाने पर्याय काढण्याची गरज असल्याची जनतेतून मागणी होत आहे.


तालुक्यातील मुळा नदीलगत असलेल्या कोंढवड शिवारातील रहिवासी असलेल्या रवींद्र (पप्पू )हिवाळे यांच्या वस्तीवर सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. या बिबट्याने हिवाळे यांच्या गायांच्या गोठ्यातील शेळ्यासाठी स्वतंत्र बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याचा तो प्रयत्न असफल ठरला. त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा हिवाळे यांच्या बांधून ठेवलेल्या कुत्र्याकडे वळविला. शेळ्यांचा ओरडण्याचा व कुत्र्याच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने हिवाळे घराबाहेर आले. त्यावेळी बिबट्याने कुत्र्याच्या नरडीची घोट घेतला होता.



हिवाळे यांनी बिबट्याला पाहून आरडाओरड केला असता बिबट्याने शेजारील शेतात धुम ठोकली.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोंढवड परिसरात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून अनेक शेतकर्‍यांच्या कालवडी, शेळ्या, बोकड व पाळिव कुत्रे फस्त केले आहे. तसेच काही ग्रामस्थ व शेतकर्‍यांवर हल्ले करून त्यांना जखमी सुध्दा केले आहे. परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा ही लावला. मात्र, हा पिंजरा गेल्या दोन महिन्यापासून आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. या पिंजर्‍याकडे अद्याप एक ही बिबट्या फिरकला नसून गावातील ज्या परिसरात बिबट्यांचा कायम वावर आहेे, अशा ठिकाणी हा पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.


मानोरी शिवारात चार दिवसापूर्वीच भरदिवसा गिन्नी गवत कापत असलेल्या शेतकर्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते. तर वरवंडीतील चिमुकलीवरचा हल्ला ताजा असताना वाढत्या बिबट्यांच्या संख्येने व वाढत्या वावराने शेतकरी, शेतमजूरांसह जनता त्रस्त झाली आहे. यावर वनविभागाने प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा ग्रामीण जनतेवर 'तेल गेल न तुपही गेलं' हाती धुपाटण घेण्याची वेळ येणार असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसांमधून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या