इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी ५० सेलिब्रिटींना समन्स

मुंबई : इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप शमलेला नाही. नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.



आई वडिलांविषयी यू ट्युबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले आणि पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले. मागील काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया गायब आहे. त्याच्या मुंबईतील घराला कुलुप आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला देश सोडण्यास बंदी घातली आहे. याच प्रकरणात राज्याच्या सायबर सेलने ५० सेलिब्रेटींना समन्स बजावले आहे. पोलिसांनी समन्स बजावलेल्यांपैकी पाच जणांचा जबाब नोंदवला आहे.महाराष्ट्र सायबर सेल सध्या इंडियाज गॉट लेटेंटच्या सर्व भागांची तपासणी करत आहे. यू ट्युबवरील कार्यक्रमासाठी पैसा नेमका कोणत्या मार्गाने येत होता आणि कसा वापरला जात होता, याचाही पोलिस तपास करत आहेत.
Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला